‘नितेश यांना घरातच लपवलंय’, शिवसेनेच्या आमदाराचा नारायण राणेंवर थेट आरोप
'नितेश यांना घरातच लपवलंय', शिवसेनेच्या आमदाराचा नारायण राणेंवर थेट आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब हल्ला (shivsena worker santosh parab) प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) अजूनही बेपत्ता आहे. जामीन अर्जासाठी नितेश राणेंनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. पण, त्यांना त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच लपवून ठेवलं आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी केला आहे.
संतोष परब हल्ल्या प्रकरणात कणकवली जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पण अजूनही नितेश राणे यांच्या कोणताही ठावठिकाणा लागला नाही. आज वैभव नाईक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नितेश राणे यांनी आता हजर व्हायला पाहिजे. नितेश राणे कुठे आहेत हे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत आहे. त्यांचे दररोज बोलनंही होतंय.
वडील केंद्रीय मंत्री असल्यामुळे आरोपीला लपण्यासाठी मदत होतेय. नारायण राणे यांनीच नितेश राणे यांना लपवून ठेवलं आहे, असा आरोपच नाईक यांनी केला.’प्रमोद वायगणकर सुखरूप घरी आले आहे. याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. ते आल्यानंतर त्यांनी कुणाचं नाव घेतलं हे सर्वांना माहीत आहे.. ते गायब झाल्यामुळे सतीश सावंत यांचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाला. ते असते तर सतिश सावंत जिंकलो असते. प्रमोद वायगणकर नसल्याने आमचा पराभव झाला. ते कुणामुळे बेपत्ता हे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. ते बेपत्ता झाल्याने आमच्या हातून जिल्हा बँक गेली, असंही नाईक म्हणाले.
आता नितेश राणे यांनी अटकेला समोर यायला हवे.पोलीस प्रयत्न करत आहेत पण केंद्रीय मंत्री त्यांचे वडील आहेत.केंद्रीय मंत्र्यांच्या घरी लपवून ठेवले असेल अशी माझी शक्यता आहे, खुद्द नारायण राणे म्हणत आहे मला माहित आहे, असंही नाईक म्हणाले. ‘येणाऱ्या काळात आम्ही निवडणूक जिंकू. राजन तेली हे पुन्हा राजकारणात येतील. आदित्य ठाकरे यांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. कोणावर जबाबदारी द्यायची हे पक्ष नेतृत्व ठरतील. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ईश्वर चिठ्ठीतून जिंकली आहे. बँक त्यांच्या हातात होती पण आम्ही तिथं पर्यंत पोहोचलो. या निवडणुकीत पैशाचा वापर मोठा झाला होता, असा आरोपही नाईक यांनी केला.