लोकशाहीच्या व्याख्येचा अभ्यास नव्याने करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये रुजो
जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा देताना जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना चिमटा
मुंबई :- आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जण विविध माध्यमातून व्यक्त होत आहे, आपल्या भावना व्यक्त करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी जयंत पाटील यांनी लोकशाहीच्या व्याख्येचा अभ्यास नव्याने करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये रुजो असं म्हणत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात ‘लोकशाही म्हणजे केवळ लोकांनी लोकासाठी चालवलेले राज्य एवढ्यापुरते त्याचे महत्त्व नाही. लोकशाहीत चळवळींचे, आंदोलनांचे महत्त्व आहे. लोकशाहीत न्यायालय महत्त्वाचे आहे. न्यायालयावरचा विश्वास हा व्यवस्थेवरच्या विश्वासाला वृद्धिंगत करत असतो. नागरिक केंद्री कारभार होणे, त्यामध्ये संकुचित वृत्तीचा थारा टाळला जाणे हे महत्त्वाचे आहे. भेदनीतीच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक समाजभवना निर्माण करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या व्याख्येचा अभ्यास नव्याने करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये रुजो आणि आपली लोकशाही चिरायू होवो ह्याच सदिच्छा.
आज जागतिक लोकशाही दिन!
लोकशाही म्हणजे केवळ लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य एवढ्यापुरते त्याचे महत्त्व नाही. लोकशाहीत चळवळींचे, आंदोलनांचे महत्त्व आहे. लोकशाहीत न्यायालय महत्त्वाचे आहे. न्यायालयावरचा विश्वास हा व्यवस्थेवरच्या विश्वासाला वृद्धिंगत करत असतो. नागरिक केंद्री कारभार… pic.twitter.com/vLHWrFEbr1
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 15, 2023