महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हितासाठी काम केलं तर ग्राहक देखील सहकार्य करेल – प्रताप हेगाडे
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हितासाठी काम केलं तर ग्राहक देखील सहकार्य करेल - प्रताप हेगाडे
मुंबई –
महावितरणचे कर्मचारी आज पासून 72 तासाच्या संपा वर जात आहे. परंतु त्यामुळे ग्राहकांची वीज सुरळीत सुरू राहणार आहे. सगळीकडे वीज बंद पडेलच अशी काय अवस्था नाही. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना महावितरण कंपनी टिकली पाहिजे वाढली पाहिजे याच मताच्या आहे. कंपनी आमची आहे सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे त्यामुळे कंपनी वाढली पाहिजे हीच भावना आमच्या आहे. केवळ संपाने हा प्रश्न सुटणार नाही खरं म्हणजे उत्तर महावितरण कंपनीकडे आणि कर्मचाऱ्यांच्याकडेच आहे. ग्राहक का या संपाला प्रतिसाद देत नाही पाठिंबा देत नाहीत.
महावितरण कंपनीने जर ग्राहकांच्या हितासाठी देखील काम केले तर ग्राहक देखील या कंपनीला सहकार्य करेल देशात सर्वात जास्त महावितरण कंपनीचे आहे आणि त्यांची पुन्हा मागणी आहे की दर वाढले पाहिजेत महावितरण कंपनी ही मोठी कंपनी आहे जर ग्राहकांच्या हित साधून कंपनीने काम केले तर कितीही खाजगी कंपनी स्पर्धेत आल्या तरी महावितरण कंपनीची बरोबरी करू शकणार नाही असे प्रताप हेगाडे अध्यक्ष महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी म्हटले आहे.