बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

मालकांची दादागिरी आता संपणार – भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार

मालकांची दादागिरी आता संपणार - भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार

मुंबई,दि. ३ डिसेंबर
सेस इमारतीतील पुनर्विकासाला वर्षानुवर्षे वर्षात खीळ पडली होती. त्या समस्येतून दूर करण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रपती यांचे अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मुंबईकरांच्या दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे. संक्रमण शिबिराची अवस्था वाईट होत्या. राहतो तिथेच सोय होणार. आता सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे. सेस इमारतीतील मालकांची दादागिरी आता संपली. भाडेकरूच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला. मुंबईकरांचा आणि विशेषता भाडेकरूनचा दिवाळीचा दिवस असावा असा निर्णय झालेला आहे. अशी प्रतिक्रीया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

प्रश्नोत्तरे
कर्नाटकने आरे केले तर आम्ही ही कारेने उत्तर देऊ
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने तणावाचे होऊ नये अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा पहिला अधिकार त्या गावांवर आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यावर भूमिका स्पष्ट आहे. शिंदे सरकार त्या भागामध्ये अनेक योजना पोहोचवणार आहे. जत भागात पाण्याच्या संदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे. कुणी अरे केले तर आम्ही कारे करू. आमचा प्रयत्न कोर्टात भूमिका मांडतो आहे. कर्नाटकच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून त्याला उत्तर देऊ..कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे महाराष्ट्रातील मंत्री तिथे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकणार नाही.
…………………………………..
उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री या प्रश्नावर उत्तर देताना- उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे मोजण्यासाठी मी एवढा मनकवडा नाही. मला मा. उद्धव ठाकरे यांची घोषणा माहित आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे त्यावरुन तुम्ही काय समजायचे ते समजा.
‌………………………………………………………
काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्ष डोक्यावर पडले आहेत का?
महाविकास आघाडीला त्यावेळी आम्ही प्रश्न विचारला होता. तेव्हा नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. तत्कालीन प्रश्नावर आजही ठाम आहे. त्यावेळी उद्धवजी नी त्यांना क्लीन चिट का दिली? डोक्यावर पडल्यासारखे काँग्रेसने प्रश्न विचारू नये
जुन्या व्हिडिओ क्लिपवर प्रश्न विचारायचे असतील तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठल्या भागाला लकवा लागला होता याचाही व्हिडिओ काढेन मी,काँग्रेसने शिवसेनेला हा वाघ नाही मांजर आहे असं म्हटलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे जुन्या व्हिडीओवर प्रश्न विचारायचे असतील तर माझ्यापेक्षा गोची तुमची होईल.
………………………………………………….
राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी आम्ही असहमत
राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी आम्ही असहमत. ते साफ चुकीचे बोलले आहेत. आम्ही स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरसुद्धा काही पक्ष याचा बाऊ आणि राजकारण करत आहेत. उरला प्रश्न छत्रपती उदयन राजे यांच्याविषयी, ते तर आमचे राजे आहेत. आंदोनल करण्याचा तसेच आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे
………………………………………………
तेव्हा का प्रश्न सोडवला नाही
संजय राऊत यांना करायचे काहीच नाही. रोज गरम हवा सोडायची आहे. त्यांनी बॉयलर उघडावा आणि कपडे सुकवावेत. सत्तेत असताना संजय राऊत यांनी बेळगावचा प्रश्न का सोडवला नाही. सत्तेत असताना भवन का नाही बांधले? त्यामुळे केवळ तोंडाची गरम वाफ बाहेर काढून यातून राज्याचे भले होईल हा त्यांचा गैरसमज आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button