ठाण्यात आढळले गोवरचे 22 संशयित रुग्ण -डॉ. कैलाश पवार
ठाण्यात आढळले गोवरचे 22 संशयित रुग्ण -डॉ. कैलाश पवार
मुंबईनंतर आता ठाण्यात सुद्धा एक ते सहा वयोगटातील गोवरचे 22 संशयित रुग्ण आढळून आले आहे. या गोवर रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे महानगर पालिका सज्ज असून या बाधितांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यातील भिवंडी परिसरात गोवर बाधित किंवा संशयित बालकांची संख्या जास्त आढळून आली असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेकडून उपचार सुरू आहेत. या गोवर वर आळा बसावा यासाठी मागील चार दिवसापासून ठाण्यातील भिवंडी, मुंब्रा, कौसा आणि इतर भागांमध्ये ठाणे महापालिका, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्याकडून गोवर लसीकरण संदर्भात सर्वेक्षण केले जात आहे. ठाण्यात देखील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे 10 आयसोलेशन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. वेळ पडल्यास ठाण्यातील कोविद सेंटर म्हणून उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा येठे देखील बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या या गोवरसाठी लागणारा लसीकरणाचा साठा उपलब्ध असून वेळ आल्यानं आणखीन लस उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.