Uncategorizedनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईयवतमाळलाईफस्टाईल
Trending

ऐन दिवाळी पाडव्या दिवशीच सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

ऐन दिवाळी पाडव्या दिवशीच सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

बीड –

बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रशासना विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अद्याप पेन्शन मिळालेले नाही.. त्यामुळे हे पेन्शन नियमित देण्यात यावं या प्रमुख मागण्यासाठी ऐन दिवाळी पाडव्या दिवशीच या शिक्षकांनी निदर्शने केली आहेत. 2020/21 पासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान आणि अंशराशीकरण रक्कम अद्याप मिळालेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील मागणीकडे दुर्लक्ष आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे तब्बल 88 कोटी रुपये थकीत आहे. त्यामुळे ही थकीत रक्कम शिक्षकांना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. येत्या काळात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र भीक मागो आंदोलन करून असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button