पीक विम्याची रक्कम जमा करण्यासह ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आ. कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु
पीक विम्याची रक्कम जमा करण्यासह ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आ. कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु
उस्मानाबाद / अमजद सय्यद
अतिवृष्टी, सततचा पाऊस व पीक विम्याचे रक्कम सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आ. पाटील यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी करीत ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरु राहणार आहे. शेतकरी संकटात व दुःखात असल्याने मी दिवाळी शेतकऱ्यांसोबत उपोषण स्थळी करणार असून खराब झालेल्या सोयाबीनच्या काडाचे लक्ष्मी पुजन केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन २०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. या रकमेत कोणतीही कपात करण्यात येऊ नये.
सन २०२०-२१ च्या पीक विम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयाची रक्कम ही विमा पात्र ६ लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.
या मागण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.