श्रीश उपाध्याय/मुंबई
उत्तर प्रदेशातील जलालपूर जिल्ह्यात डॉक्टरची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखा ९ ने वांद्रे येथून अटक केली आहे.
वांद्रे येथील रंगशारदा येथे कोणीतरी शस्त्रांसह येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 9 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मंगेशकुमार संग्राम यादव याला एक पिस्तूल व 3 जिवंत काडतुसांसह अटक केली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील जलालपूर जिल्ह्यात मंगेशवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी आणि डकैतीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. जलालपूर येथील डॉक्टरची हत्या करून तो फरार झाल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना दिली असून तपास सुरू आहे.
सह पोलिस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त (पी-१) राज टिळक रोशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.