बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात घेण्यासाठी महानगरपालिकेने २०० कोटींची तरतूद करावी – राजेश शर्मा

सेव्हहिल्स हॉस्पिटल ताब्यात घेण्यास महानगरपालिका व राज्य सरकार उदसीन का ?

मुंबई,

 

मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे १५०० बेड्सचे प्रशस्त हॉस्पिटल हे आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. एवढे मोठे प्रशस्त हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देता येऊ शकते. सध्या किरकोळ आरोग्य सेवा सुरु आहेत त्या पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात व सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तातडीने हालचाली केल्या पाहिजेत. हे हॉस्पिटल ताब्यात घेण्यासाठी आगामी अर्थंसकल्पात महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी माजी महापौर व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, सेव्हन हिल्स रुग्णालय हे खाजगी कंपनीला चालवण्यास देण्याचा घाट घातला जात आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे हॉस्पिटल ताब्यात घेण्यास इच्छुक असल्याचे समजते परंतु महानगरपालिका व राज्य सरकार यांनी हे हॉस्पिटल कोणत्याही खाजगी व्यवपस्थापनास देण्याऐवजी स्वतः मुंबई महानगरपालिकेने चालवले पाहिजे. सेव्हन हिल्स हॉस्पिटल १६ एकर जागेवर आहे, १५०० बेड्सची क्षमता आहे, बाजारभावानुसार या जागेचे ३ हजार ते ४ हजार कोटी रुपये मुल्य आहे. हॉस्पिटलच्या शिल्लक असलेल्या जागेत मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु करता येऊ शकते. एम्ससारखे सर्व वैद्यकीय सुविधांनीयुक्त असे हॉस्पिटल होऊ शकते. कोवीड काळात याच रुग्णालयात ६० हजार पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत.
सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेचा थंड प्रतिसाद पाहता हे रुग्णालय अंबानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. परंतु हे हॉस्पिटल इतर कोणत्याही खाजगी व्यवस्थापनाकडे देऊ नये त्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत त्यासाठीच २०० कोटींची तरतूद करावी, असेही राजेश शर्मा म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button