श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच 10 ने अंधेरी परिसरात सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश करत 14 आरोपींना अटक केली आहे.
अंधेरी पूर्व येथे काही लोक अमेरिकन नागरिकांना औषधे विकण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 10 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 14 आरोपींना अटक केली.
साकिब सय्यद, यश शर्मा, उजेर उस्मान शेख, गौतम म्हाडिक, जुनेद शेख, जीवन गौडा, मुनीब शेख, हुसेन शेख, विजय कोरी, हिना खान, प्रियंका राजीव, मोहम्मद सुफियान मुकादम, शिफा बोट आणि जनिथ ब्रिगांझा या आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 40/2024 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 10 चे प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.