चार वर्षांत मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 1973 मध्ये या सागरी सेतूची संकल्पना मांडली होती. मात्र 40 वर्षात हे काम झाले नाही, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या अटल सेतूसाठी प्रधानमंत्री यांनी थेट एम.एम.आर.डी.ए. ला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
मागील 50 वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या 25 वर्षांते देशाला, महाराष्ट्राला आणि मुंबईला रायगडचा परिसर ताकद देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. 65 टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे. या सेतूने या विभागाला कनेक्टिव्हिटी दिली आहे.
मुंबईत कुठूनही 59 मिनिटात पोहोचता आले पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्या पद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असे नेटवर्क तयार होईल”, असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी जनतेला सांगितले. यापुढे रायगड, नवी मुंबई हे नवे इंडस्ट्रियल हब असेल. येथे नवीन विमानतळ लवकरच पूर्ण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शक्ती आमच्यामागे उभी असल्यामुळे राज्यातील पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण होतील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.