बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया

ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर

मुंबई :

 

पंतप्रधान मोदींनी मालदीव ऐवजी लक्षद्विप अशी साद घातली ती देशातील भुरळ पडणारे नितांत रम्य सागरी किनारे व तेथील पर्यटन विकासासाठी. आपल्या महाराष्ट्रालाही सुंदर, समृद्ध स्वर्गीय सागरी किनारा लाभला आहे या ठिकाणच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन द्यावे यासाठी सर्व पर्यटन कंपन्याने विशेष भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.

आपल्या कोकणात अशी अनेक गावे आणि सागरी किनारे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. केवळ तारकर्ली, गणपती पुळे, मुरुड जंजिरा, दिवे आगार, अलिबागच नव्हे तर भांडार पुळे असो की भोगवे, वेणेश्वर, अंजर्ली, दाभोळी, देवगड, कोंडुरा, कळशी , रेवदांडा, असे अविस्मरणीय अनुभव देणारे अनेक सागर किनारे आहेत. महाराष्ट्रातील व देशातील पर्यटकांनी आवर्जून अनुभवण्यासारख्या या सागर किनाऱ्यांना जरूर भेटी द्याव्या आणि कोकणातील व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.

केवळ आपण स्वतः न जाता आपल्या वर्तुळातील सर्व देशपरदेशातील प्रतिनिधी आणि मित्रमंडळी या नितांत रम्य सागर किनारी जातील यासाठीही प्रयत्नशीलराहावे असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन प्रोत्साहन

राज्यातील एकूणच पर्यटनाला सतत प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र चेंबर गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीही चेंबर प्रयत्नशील आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजकांनी कोकण किनारी जास्तीतजास्त पर्यटक येतील आणि खास करून काहीश्या दुर्लक्षित सागर किनाऱ्यावरील पर्यटन वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. यादृष्टीने महाराष्ट्र चेंबरने हा विषय प्राधान्याने हाती घेतला असून त्याबाबत संबंधितांनी चेंबरशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button