पूनम महाजनच्या विरोधात मोर्चा
पुनम महाजन उत्तर द्या ,आपण महाराष्ट्राला का फसवलात ?
मुंबई
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव आणि उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष अणि माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदार पूनम महाजनचा विरोधात मोर्चा काढ़ला गेला .
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर मध्य मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी ८ एप्रिल २०१८ रोजी बांद्रा पूर्व गव्हर्नमेंट कॉलनी इमारत क्रमांक १० च्या शेजारी, न्यू इंग्लिश स्कुल समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असे खोटे आश्वासन देऊन शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत *“चुनावी जुमला”* दिला होता. त्यांनी त्यांच्या खासदार फंडामधून किंवा खाजगी निधीतून महाराजांचा भव्य, दिव्य असे मंदिर बांधले जाईल अशी घोषणा केली होती आणि मराठ्यांची राजधानी रायगड किल्ल्यावरील पाणी आणि माती आणून ज्या जागी भूमिपूजन केले त्याजागी आज २०२४ साल उलटूनही पुनम महाजन यांनी ढुंकूनही पाहीले नाही.
या कृतीचा निषेध म्हणून आज, शनिवारी सकाळी ११.०० वाजता पुनम महाजन यांच्या विरोधात वांद्रे पूर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा करण्यात आला.
यामध्ये काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह खालील नेते उपस्थित होते.
अमोल मातेले,(मुंबई अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ),
चंदन सोनटक्के, उत्तर-मध्य मुंबई. जिल्हा उपाध्यक्ष,
डाॅ. सुरेना मल्होत्रा, (मुंबई काय्रा्ध्यक्ष महीला)
नीझाम कुरेशी (अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष उत्तरमध्य, मुंबई.),
जसबीर सिंग (माजी नगरसेवक)
सुहास पाटील(तालुका अध्यक्ष, बांद्रा पुर्व)
संतोष पाटील(तालुका अध्यक्ष, बांद्रा पश्चिम)
प्रभाकर पेडणेकर, उपाध्यक्ष(उ. म. जिल्हा)
ईमरान तडवी(मुंबई सरचिटणीस)
अस्लम शेख(जिल्हाध्यक्ष, उ. म. सेल)
सलमा जफर शेख(वॉर्ड अध्यक्ष)
आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.