बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मुंबई भाजपातर्फे मुंबईत श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची माहिती

२० ते २३ जानेवारी या कालावधीत कार्यक्रम

मुंबई दिनांक १६ जानेवारी २०२४

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

 

कार्यक्रम २० ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबईत चार ठिकाणी होणार आहेत. याशिवाय मुंबईत ठिकठिकाणी प्रत्येक विभागात महाआरती, देवळांची साफसफाई, रोषणाई, विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

संयोजन जीवन गाणी तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असणार आहे. गायक ऋषिकेश रानडे, निनाद आजगावकर, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, केतकी भावे – जोशी यांचे गीत सादरीकरण डॉ. संजय उपाध्ये यांचे निवेदन तर सोनिया परचुरे आणि ग्रुपचे नृत्य सादरीकरण असणार आहे. मोफत प्रवेशिका दोन व्यक्तींसाठी असणार असून कार्यक्रमादिवशी तिकीट खिडकीवर आसन क्रमांक देऊन नाट्यगृहात प्रवेश दिला जाईल. उद्यापासून प्रवेशिका नाट्यगृहात उपलब्ध करुन देण्यात येतील.

असे होतील कार्यक्रम
शनिवार २० जाने. रात्री ८.३० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)

रविवार २१ जाने. सायं. ६.३० वा. साहित्य संघ मंदिर, गिरगाव

सोमवार, २२ जाने. सायं. ६.३० वा. रंगशारदा, वांद्रे (प.)

मंगळवार, २३ जाने. रात्री ८.३० वा. यशवंत नाट्यगृह, माटुंगा

महाराष्ट्रातील संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

या निमित्ताने महाराष्ट्रातील संताचा भव्य दर्शन सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे. अक्लकोट येथून स्वामी समर्थाच्या, शिर्डीतून साई बाबांच्या, सज्जनगडावरुन रामदास स्वामी आणि शिमोगा येथून श्रीधर स्वामी तसेच शेगाव येथून गजानन महाराजांच्या पादूका मुंबईत दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत.
मंगळवार, २३ जाने. २०२४, सकाळी ८.३० ते रात्री ९.३० पर्यंत पहिला मजला, सिम्फनी बँक्वेट, विजयनगर सोसायटी, स्वामी नित्यानंद मार्ग, अंधेरी येथे या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button