श्रीश उपाध्याय/मुंबई
पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींना 8 पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे.
कोणीतरी मोठ्या प्रमाणावर पिस्तूल आणून मुंबईत विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चेतन माळी याला चार पिस्तुल व 8 काडतुसांसह अटक केली. चौकशीदरम्यान चेतनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण येथून तीन पिस्तूल आणि 5 काडतुसे जप्त करण्यात आली. चेतनच्या सतत संपर्कात असलेला दुसरा आरोपी सीनू पिडगेला याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दोघांविरुद्ध ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या सूचनेनुसार ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनंत शिंदे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.