स्वच्छता अभियानातून एक लोकचळवळ निर्माण व्हावी – मुख्यमंत्री
स्वच्छता अभियानातून एक लोकचळवळ निर्माण व्हावी - मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी केलेल्या आवाहनानुसार राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मंदिर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी रविवारी १४ जानेवारी २४ रोजी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील तपोवन मंदिरामधील भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक ४३ चे नगरसेवक श्री विनोद मिश्रा द्वारे आयोजित स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला. या स्वच्छता अभियांनात मा. नगरसेवक श्री विनोद मिश्रा जी यांच्या सह मालाडचे रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वंकष स्वच्छता अभियान ही एक लोकचळवळ निर्माण करायची आहे. या चळवळीच्या माध्यमातून राज्य स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि निरोगी करण्याचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तपोवन मंदिरातील मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली. तसेच अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मालाड (पूर्व) येथील मंदिर स्वच्छता अभियानाबद्दल बोलताना मा. नगरसेवक विनोद मिश्रा जी यांनी सांगितले की, १४ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान मालाड (पूर्व) परिसरातील मंदिरांची साफ सफाई करण्यात येणार आहे. यामध्ये संतोषी माता मंदिर,कोकणी माता मंदिर व विठ्ठल मंदिर, जडेश्वर महादेव मंदिर,विल्लेश्वर महादेव मंदिर, अंबेमाता मंदिर आणि सीताबाप्पा राम मंदिर यांचा समावेश आहे. स्वच्छता हीच सेवा हा विचार मनात ठेवून आम्ही मालाडवासी हा अभियान राबवित आहोत असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.