कर्णबधिर मुलांनी सादर केली रोबटीक प्रात्यक्षिके
फक्त कर्णबधिर मुलांसाठी कार्यरत संकल्प शिक्षण संस्थेतर्फे एमएससीआयटी व टॅली पास झालेल्या मुलांचा सत्कार व पारितोषक वितरण समारंभ माटुंगा पूर्व येथील अखिल भारतीय महिला परिषद सेवाभारती येथे संपन्न झाला. या एमएससीआयटी व टॅली परीक्षेत मिळून एकूण 52 मुले पास झाली.
या मुलांचे कौतुक करण्यासाठी व या मुलांना पारितोषिक देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार व आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेविका नयना सेठ, ज्येष्ठ समाजसेविका सलमा हमिद, संस्थेच्या संचालिका पुष्पाताई भोसले, संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रघुनाथ धर्मा थवई, TIS च्या संस्थापिका मीनल मजुमदार, डॉ प्रसाद अकेरकर, सेवाभारती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिता काशीकर,शामल कुर्डूकर, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रोबटीक प्रात्यक्षिके सादर केली. सूत्रसंचालन व पाहुण्यांचे आभार पुष्पा सुर्वे यांनी मानले. समाजसेविका सलमा हमीद यांच्याकडून मुलांना बॅगा बक्षीस देण्यात आल्या.