एक कोटीच्या एमडीसह दोघांना अटक
मालवणी पोलिसांनी एमडी बनवणारी लॅब पकडली.
श्रीश उपाध्याय
मुंबई
मालवणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून १.०६ कोटी रुपयांच्या एमडीसह प्रयोगशाळा जप्त केली.
५ जानेवारी रोजी मालवणी पोलिसांनी अबरार इब्राहिम शेख याला १०० ग्रॅम एमडी आणि थिनरच्या बाटलीसह अटक केली होती. अबरारच्या चौकशीच्या आधारे आणखी एक आरोपी कांदिवली येथे एमडी बनवण्याची लॅब चालवत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 9 जनवरीला छापा टाकून नूर आलम चौधरी याला ५०३ ग्रॅम एमडीसह अटक केली. ताब्यात घेतलेल्या एमडीची किंमत 1.06 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांनी
एमडी बनवणारी लॅबही पकडली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन, पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेमाजी आढाव यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.