श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबईतील हॉटेलमध्ये मुलींसोबत विनयभंग करणे हिस्ट्री शीटर गुंडाला महागात पडले.
मुंबई क्राईम ब्रँच 9 ला गुप्त माहिती मिळाली की, 7 जानेवारीच्या रात्री अंधेरी पश्चिम येथील हॉटेलमध्ये एका तरुणाने रिव्हॉल्व्हर दाखवून मुलींचा विनयभंग केला.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्या हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले. तपासाअंती पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्या समद रईस खान आणि त्याचा साथीदार मोहम्मद आसिफ अब्दुल रशीद खान याला रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे. अटक आरोपी समद खान याच्यावर अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत.
दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी आंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त राज टिळक रोशन , सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 9 चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.