“क्रांतिमहानायक भगवान परशुराम यांच्यावर चर्चासत्र संपन्न”
श्री नरसिंह के दुबे चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल ब्रह्म विज्ञान संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने काल नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात श्री भगवान तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली “क्रांती महानायक भगवान परशुराम” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दुबे, प्रमुख पाहुणे अडव्होकेट समरनाथ पांडे, विशेष अतिथी चिंतामणी द्विवेदी, वेदमूर्ती गोरक्षनाथ पैठणकर, माननीय अतिथी आशिष मिश्रा, माननीय डॉ.राजेंद्र तिवारी, अखिल भारतीय ब्राह्मण परिषदेचे सरचिटणीस देवेंद्र तिवारी, डॉ.ओमप्रकाश दुबे यांनी वेद मंत्रोच्चार सह सरस्वती, भगवान गणेश, भगवान धन्वंतरी आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मंचाचे संचालन डॉ.चंद्रभूषण शुक्ल यांनी केले , डॉ.रोशनी किरण यांनी सरस्वती वंदना व परशुराम स्तोत्र म्हटले . संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दुबे यांनी सन्मानित पाहुणे व वक्त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रास्ताविकात डॉ.ओमप्रकाश दुबे यांनी “भगवान परशुराम”यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, “भगवान परशुरामांनी” समाजातील समता, न्याय आणि विकासासाठी कार्य केले आणि अहंकार, अन्याय आणि शोषण नष्ट केले. तसेच “भगवान श्री परशुरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला .
डॉ. श्री भगवान तिवारी यांनी मानवाला भेदभाव विसरून एकता निर्माण करण्याचा संदेश दिला. प्रमुख वक्ते डॉ. अवनीश सिंह , डॉ. अवधेश राय, श्रीमती संगीता दुबे, डॉ. विवेक सिंग यांनी भगवान परशुराम यांच्या जीवनाच्या विविध विषयांवर सविस्तर प्रकाश टाकला. वेदमूर्ती गोरक्षनाथ पैठणकर यांनी संस्कृत आणि संस्कृती या दोन्हींचे रक्षण करण्याचा संदेश दिला. आचार्य पंडित रामव्यास उपाध्याय यांनी संस्था तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश दुबे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि आभार व्यक्त केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ.सूर्यमणी सिंह, विकास दुबे, सुनील तिवारी, दिपू सिंह , डॉ.शिवनारायण दुबे, डॉ.परमिंदर पांडे, प्रोफेसर रामपाल सिंह , धनंजय चौबे, आर.के. सर, कवी, साहित्यिक राम सिंह , साहित्यिक रासबिहारी पांडे, पत्रकार प्रभाशंकर शुक्ला, रमेश राय, हरिप्रसाद पांडे, नवलकिशोर मिश्रा आदी विद्वानांच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भरले होते.