गुन्हे शाखा 6 ने दोन बांगलादेशी नागरिकांना केली अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
बेकायदेशीरपणे भारतात येणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखा 6 ने अटक केली आहे.
एक व्यक्ती बांगलादेशी नागरिकांना शिवडी परिसरात आणून विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे काम करण्यासाठी पाठवते, अशी गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 6 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अक्रम शेख याला अटक केली. अक्रम बेकायदेशीरपणे भारतात आला होता आणि इतर बांगलादेशींनाही आणत होता. अक्रमची चौकशी केल्यानंतर लिमा शहजान या बांगलादेशी महिलेलाही अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा 6 तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त लखमी गौतम, अपर पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज टिळक रोशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 6 चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने वरील कारवाई केली.