मुंबई, दि. 4 ऑक्टोबर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या सुरु असलेल्या तयारीचा संघटनात्मक आढावा आज झालेल्या मुंबई भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीमध्ये घेण्यात आला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दादर वसंत स्मृती येथे पार पडली. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, सुनील राणे, मनिषा चौधरी, प्रसाद लाड आणि महामंत्री संजय उपाध्याय आदी उपस्थित होते.
भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन 45 प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु आहे. या दृष्टीने मुंबईतही भाजपा विविध पातळीवर काम करीत असून याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. तसेच मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघ त्यातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थिती याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजन ही करण्यात आले.
या सोबत केंद्रीय भाजपाकडून देण्यात आलेले विविध उपक्रम, केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी करण्यात येत असलेले संघटनेनेकडून काम, मेरी माटी मेरा देश, घर घर संवाद, बुथ सक्षमीकरण अभियान याबाबतही आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रदेश तर्फे काढण्यात आलेल्या ओबीसी यात्रा व प्रदेशाध्यक्ष प्रवास योजनेचे नियोजन याबाबत ही चर्चा करण्यात आली, अशी माहिती संघटन मंत्री संजय उपाध्याय यांनी दिली.
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,
राज्यामध्ये काही विशेष पक्ष, गट आणि त्यांचे विशेष नेते हे महाराष्ट्रातील जाती जातीत मधला संवाद बिघडवून वीसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे सारे.सुरु आहे. याबाबत कालच्या महाराष्ट्र भाजपाच्या बैठकीत आम्ही चर्चा केली. भाजपा या बाबत संवेदनशील पणे लक्ष ठेवून असून आजच्या मुंबई भाजपाच्या बैठकीतही याबाबत चर्चा आम्ही केली .