पुनर्विकास साठी लोकानां बळजबरीने निष्कासित करण्याचा प्रयत्नावर राम कदम यांच्या संतापाचा भडका उडाला
श्रीश उपाध्याय
मुंबई
इमारतींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांना जागा रिकामी करण्यासाठी महापालिकेच्या दबावतंत्राविरोधात भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत आवाज उठवला.
इमारतींचा पुनर्विकास करताना पालिका प्रशासन अनेकदा बिल्डरच्या दबावाखाली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांवर दबावतंत्राचा वापर करते.
मुंबईतील विक्रोळी पार्क साइट परिसरातील इमारत क्रमांक 22, 23 आणि 24 रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासन दबावतंत्राचा वापर करत आहे. या प्रकरणी स्थानिक आमदार राम कदम यांनी अनेकवेळा हस्तक्षेप करून पालिका अधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पालिका अधिकारी आपला डाव सोडत नव्हते. अखेर राम कदम यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित करून या भागातील सर्व 28 इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना 590 चौरस फुटांची घरे देण्याची मागणी केली आणि पालिका प्रशासनाकडून स्थानिकांना घरे रिकामी करून देण्यासाठी केल्या जात असलेल्या दादागिरीवर तीव्र आक्षेप घेतला.