Uncategorizedक्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

एम एच बी पोलीसची कार्रवाई.

घटनेनंतर अवघ्या तीन तासांत चोरट्यांना अटक करण्यात आली

मुंबई

बोरिवली पश्चिम भागातील एका चोरीच्या घटनेची उकल करत एम एच बी पोलिसांनी चोरीच्या मालासह दोन चोरट्यांना अटक केली आहे.
एम एच बी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले की, 28 मे रोजी बोरिवली पश्चिमेकडील डेली नीड नावाच्या किराणा दुकानाबाहेर ठेवलेला डीप फ्रीझर चोरीला गेला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सीसीटीव्हीचा शोध घेतला. फुटेजच्या सहाय्याने डीप फ्रीजर कोणत्या टेम्पोमध्ये नेण्यात आला याचा शोध घेण्यात आला. टेम्पो चालकाला पकडून त्याची चौकशी केली असता, दोन जणांनी त्याला अॅपच्या माध्यमातून डीप फ्रीझर वाहतुकीचे कंत्राट दिल्याचे निष्पन्न झाले. या चालकाच्या मदतीने पोलिसांनी नालासोपारा येथून दोन्ही आरोपी ओमाराम रबरीयन आणि वोताराम मेगवाल यांना अटक केली. पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीला गेलेला डीप फ्रीझरही जप्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button