बातम्यामहाराष्ट्र

*श्री.अशोक काकडे साहेब व्यवस्थापकीय संचालक,* *छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे. यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे*

एम.फिल./पीएचडी (Ph.D.) आधीछात्रवृत्ती (Fellowship) साठी 10 जून २३ ऐवजी 30 जून २३ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत...

*एम.फिल./पीएचडी (Ph.D.) आधीछात्रवृत्ती (Fellowship) साठी 10 जून २३ ऐवजी 30 जून २३ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत…*

*बुधवार दिनांक 31 मे 2023*

मराठा कुणबी कुणबी मराठा व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी सारथी महाज्योती तर्फे फेलोशीप देण्यात येते. सारथीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन आधीछात्रवृत्ति (फेलोशिप) करिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहे. अर्ज भरतेवेळी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यात मे महिना असल्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याने डोमेसिल, नॉनक्रिमिलेयर, इन्कम सर्टिफिकेट व इ.डब्ल्यू.एस (EWS) सर्टिफिकेट मुलगी असेल तर वडिलांचे इनकम सर्टिफिकेट इत्यादी जाचक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी फार विलंब लागत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयातून कागदपत्र बनवण्यासाठी खूप अडचणी सामना करावा लागतो. सर्व कागदपत्रे ऑनलाईन संकेतस्थळावरून काढायची असेल तरी अनेक वेळा शासनाचे संकेतस्थळ चालत देखील नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे पेज निर्माण झाला आहे.

एमफील / पीएचडी साठी उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज   भरण्याचे काम चालू आहे. परिपूर्ण माहिती मार्गदर्शन तत्त्वे ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सूचना दिलेले आहेत. पण कागदपत्रांची पूर्तता करताना विद्यार्थ्यांच्या नाका मध्ये दम येतो. सारथीने दिनांक 10 जून २३ पर्यंत खुली राहील असे सांगितले आहे. पण महाराष्ट्र मधून अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी डोमेसिल, नॉनक्रिमिलेयर, इन्कमसर्टिफिकेट व इ.डब्ल्यू.एस (EWS) सर्टिफिकेट  मुलगी असेल तर वडिलांचे इनकम सर्टिफिकेट इत्यादी जाचक कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. 10 जून २३ च्या ऐवजी 30 जून २३ इतकी मुदत वाढ देण्यात यावी. अशी मागणी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठवू मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button