मे. अदानी इलेक्ट्रिसिटी, नवी मुंबई यांना मुलुंड, भांडुप व ठाणे जिल्ह्यातील ठराविक भाग, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा आणि उरण या भागातील वीज वितरणासाठी समांतर परवाना देण्यास तीव्र विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्याच्या वीज उद्योगातील ३० संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी दिनांक ०९ डिसेंबर २०२२ रोजी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री महोदय यांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या धोरणास विरोध करण्यासाठी क्रमबध्द आंदोलन व बेमुदत संपाची नोटीस दिलेली आहे.
अदानी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित कुरुन गडगंज १००० कोटी रूपया पेक्षा जास्त महसुल मिळवणारा प्रदेश उदा: नवी मुम्बई, पनवेल, उरण, ठाणे, मुलुंड, भांडूप, तळोजा क्षेत्रातील हे असा ५ लाख वीजग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कपंनीला हस्तांतरीत व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून तसा परवाना मागितला आहे. खाजगी कार्पोरेट घराण्याने पुर्णतः औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर परवान्याची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला आहे.