३ महिन्यापासून या सरकारने दिल्लीचं पाय पुसणं करुन टाकलं आहे – संजय राऊत
३ महिन्यापासून या सरकारने दिल्लीचं पाय पुसणं करुन टाकलं आहे - संजय राऊत
महाराष्ट्राचं सरकार कुणाच्याही नावानं चालूद्या. महाराष्ट्राच्या अस्मितेची, जमिनीचं रक्षण करणं जमलं नाही. त्या सरकारनं एकही दिवस राहणं गरजेचं नाही.
प्रतिकार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं जाते. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला जात आहेत.
विरोधीपक्षानं अशा वेळा लढाई केली, मुळात ३ महिन्यापासून या सरकारनं दिल्लीचं पाय पुसणं केले आहे.
अशा प्रकारची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती
दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं.डरपोक सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही सीमा कुरतडल्या जात आहेत.
हे सरकार नामर्दासारखं बसलेल आहे.
जेव्हा जेव्हा महाराष्ट्राववर असं संकट आलं आहे तेव्हा विरोधी पक्षाने लढाई केली आहे.
कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यात स्वतः घुसून दादागिरी करतो, स्वतःला भाई बोलता ना मग दाखवा भाईगिरी
मेघालय आसाम सीमेचाही वाद सुरू आहे. ताबडतोब हा भाग केंद्रशासित करा या सरकारला एकही मिनिट सत्तेत राहण्याचा हक्क नाही.
महाराष्ट्राचे लचके सहजपणे तोडता यावे म्हणुन शिवसेनेचे सरकार घालवलं आहे.
आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला नाजूक करायचं, प्रकल्प गुजरातला पाठवायचे.तोंडाला कुलुप लावलंय का?
दाखवा या महाराष्ट्राला नाहीतर राजीनामा द्या
ढाल तलवारीच्या लायकीचे नाहीत यांना कुलुप चिन्ह दिलं पाहिजे
केंद्राकडून टेंडर घेऊन आलेलं सरकार आहे, महिन्याला कितीचं टेंडर निघतं आकडा आहे माझ्याकडे, काय करणार मला परत तुरुंगात टाकाल.
अनेक दिग्गजांनी या साठी प्राण सोडले, इथे बसून टीका करता, महाराष्ट्र पेटला ना त्याला जबाबदार गृहमंत्री असतील केंद्रातले, १०६ हुतात्मे हवेत ना यांना आम्ही तयार आहोत
महाराष्ट्रात कर्नाटकात भाजपचंच सरकार आहे हे तुम्हाला दिसत नाही? जर केंद्र स्वतःला मोठं समजतंय बाप आहे तर का प्रश्न सोडवत नाही?
बोम्मई पण ओरिजिनल भाजपचे नाहीत, कॉंग्रेसमधून आलेला माणूस
सर्व राज्या्नी एकत्रित राहणं गरजेच आहे. आम्ही आमच्या हक्काचीच गोष्ट करतोय, ही मानवतेची लढाई आहे
बेळगावच्या आसपास जिथं अत्याचार सुरू आहे. महाशक्तीला सांगा हिंमत असेल तर याला केंद्रशासित प्रदेश बनवा.
तुमच्यासारखा नामर्द मुख्यमंत्री झाला नाही. हे डरपोक आहेत.काय कराल तुरुंगात टाकाल? आम्ही घाबरत नाही.
नुसत्या भेटीगाठी करून चालणार नाही, महाराष्ट्राचं नुकसान झालं. एसटी बसेस रोखणं गरजेचं नव्हतं. याची काही गरज नव्हती, सर्वांना त्याचा त्रास होतो.
BYTE : संजय राऊत