औरंगाबादमहाराष्ट्र
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर आंदोलन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल काढलेल्या वक्तव्य बद्दल आज सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरापासून ढोल वाजवा आंदोलनाला सुरुवात झाली आहे.आज महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर सर्व शिवभक्त ढोल वाजवून घोषणा देण्यात आल्या यावेळी आंदोलन करताना मंत्री महोदयाची चर्चा करण्यात आली आहे. मंत्री महोदयांना जाब विचारला की, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ? असल्यास आपण राज्यपाल हटवण्याची मागणी केली आहे का ? असे प्रश्न यावेळी मला विचारण्यात आले. जर राज्यपाल हटाव मोहीम राबवले नाही तर असेच आंदोलन प्रत्येक मंत्र्यांच्या घरात समोर सुरू राहणार असल्याचे यावेळी विनोद पाटील म्हणाले