विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचा मका जळून खाक; दोन लाखाचे नुकसान
विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचा मका जळून खाक; दोन लाखाचे नुकसान
चोपडा तालुक्यातील अनुवर्दे बु. येथील मोतीलाल श्रावण चौधरी वय 42 यांच्या शेतात सहा बिगे क्षेत्रात मकाचे लागवड केलेली होती त्या मकाचे कंस कापून मका काढण्यासाठी शेतातच ढिग केलेला होता ज्या ठिकाणी मक्याच्या ढिग केलेला होता त्याचा बाजूला महावितरणाची डीपी व विद्युत तारांचे खांब असल्याने खांब्यावरील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किट मुळे मका काढण्यासाठी केलेला ढिग वरती ठिणगी पडल्याने मका संपूर्ण जळत होता सदर घटना ही रात्री झाल्याने सकाळी ही घटना कळल्यावर शेतकरी शेतात गेल्यावर त्या ठिकाणी पाहिले तर संपूर्ण मका जळून खाक झालेला होता सदर घटनेचे खबर तलाठी व पोलीस स्टेशनला देण्यात आल्याने तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला मोतीलाल चौधरी यांनी फिर्यादी वरून आकस्मित आगेची नोंद करण्यात आलेले आहे आगीमुळे शेतकऱ्याचे दोन लाख 25 हजार रुपयांचा नुकसान झालेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं