संविधान दिनानिमित्ताने औरंगपुरातील भडकल गेट परिसरात काढण्यात आली भव्य संविधान रॅली
संविधान दिनानिमित्ताने औरंगपुरातील भडकल गेट परिसरात काढण्यात आली भव्य संविधान रॅली
आज शनिवार 26 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद शहरातील औरंगपुरा चौक ते भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत संविधान दिनानिमित्ताने भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले हेआयोजन दलित पॅंथरच्या वतीने करण्यात आले त्यावेळी सदरील संघटनेचे प्रमुख अनिल बसते यांच्या हस्ते संविधान रॅलीचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर संविधान पूजन करून सदरील संविधान रॅली ही औरंगपुरा परिसरातून काढण्यात आली यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.भडकल गेट येथे संविधान वाचन करण्यात आले,यावेळी पॅंथरचे प्रमुख अनिल बस्ते हे म्हणाले की,देशाचा विकास करण्यासाठी संविधानाची जागृती करणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी संविधान लिहून देशाच्या विकासामध्ये मोठी भर टाकली आहे, मात्र काही मनुवादी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही टीका त्यांनी यावेळी केली आहे सदरील संविधान रॅली मोठ्या थाटात आज संपन्न झाली आहे.