सिंधूताई शेतकरी महिला उत्पादक कंपनीचे अृमता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
सिंधूताई शेतकरी महिला उत्पादक कंपनीचे अृमता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहेच, परंतू दैनंदिन जीवनात चांगले व्यवस्थापन केल्
यास काम करण्याची उर्जा ही मिळत राहते. कोणाला काहीही म्हणू द्या आपण आपल्या निश्चयावर ठाम राहायचे, ‘जिंकुन घे चार दिशा, गर्जना कर यशाची’या आपल्या कवितेच्या ओळीतून अमृता फडणवीस यांनी प्रवरा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थींनींमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.जनसेवा फौंडेशन आणि राहाता पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांचा मेळावा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यापुर्वी सौ.अृमता फडणवीस यांच्या हस्ते सिंधूताई शेतकरी महिला उत्पादक कंपनी, महिलां करीता स्वतंत्र व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जनसेवा फौंडेशनच्या माध्यतून उत्पादीत करण्यात येत असलेल्या सेंद्रीय सॅनिटरी नॅपकीनच्या उत्पादनाची पाहाणी करुन, त्यांनी समाधान व्यक्त केले.
बचत गटासारख्या चळवळीतून प्रत्येक गावाने आर्थिक विकासात योगदान दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ५ अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न पुर्ण होण्यास वेगळ लागणार नाही, पण यासाठी कष्ट, सुंदर उत्पादन, ट्रेनिंग घेवून चांगले मार्केटींग असा प्रवास तुम्हाला करावा लागेल. बचत गटांचा हा यशस्वी प्रवास पाहण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’असा आशावाद व्यक्त करुन अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला.
याप्रसंगी अकोले नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सोनालीताई नाईकवाडी, उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, प्रभारी गटविकास आधिकारी श्री.सुर्यवंशी, तालुका कृषि आधिकारी बापूसाहेब शिंदे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ.लिलावती सरोदे, जनसेवा फौंडेशनचे सचिव डॉ.हरिभाऊ आहेर, लोणी बुद्रूकच्या सरपंच श्रीमती कल्पना मैड, प्रभावती खालकर, प्रकल्प संचालिका सौ.रुपाली लोंढे यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.