बातम्यामहाराष्ट्र

भिडे गुरुजीनी महिलांचा आदर करावा : अमृता फडणवीस

भिडे गुरुजीनी महिलांचा आदर करावा : अमृता फडणवीस

भिडे गुरुजी हे हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला खूप आदर आहे. परंतु या प्रकारे महिलांनी कसे जगावे हे ते सांगू शकत नाहीत. महिलांचे एक जीवनशैली असते. त्या प्रकारे ती जगते तिचा आदर करावा.

पुढे त्या म्हणाल्या, पंढरीमध्ये आम्ही आलो, वारकऱ्यांसह फुगडी खेळली. त्यांच्याबरोबर ताल धरला यात खूप आनंद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मध्यरात्री शिव विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा आमच्या हस्ते होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांचे जीवन सुखद होवो. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण होवो. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व समस्या कमी व्हावा. कर्ज दर कमी होत. अशी मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेकडे करणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. आषाढी व कार्तिकीची पूजा करण्याचा मान आपणास मिळाला आहे. पुढच्या आषाढीत विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येण्याची आपली इच्छा आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी अमृता फडवणीस यांना विचारला. यावर त्या म्हणाल्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी आम्ही कोणत्याही महिन्यात पंढरपूरला येऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button