जग कितीही आधुनिकता आणि सोशल मिडीयाकडे वळलं तरी आजही कल्याण डोंबिवली शहरात आवर्जून नाट्यगृहात जाऊन नाटकं पाहणारे दर्दी रसिक आहेत. मराठी कलाकारांना नेहमीच कल्याण डोंबिवली शहराचं आकर्षण राहीलंय. अनेकदा सोशल मिडियावरून नाट्य कलाकारांनी या शहरातील नाट्यगृहांबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. त्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची दोन्ही नाट्यगृह कात टाकू लागलीये..आता कलाकार प्रशांत दामले यांनी नाट्यरसिकांना नाट्यगृहापर्यंत आणण्याची जबाबदारी आम्हा कलाकारांची आहे.पण नाटक संपल्यावर जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतो त्यावेली नाट्यगृह चांगलं होत.एसी छान होता.स्वच्छतागृह चांगलं आहे..अशा गोष्टी होणं अपेक्षित आहे. कल्याण डोंबिवली महानागरपालिकेचं कल्याण मधील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे दोन्ही नाट्यगृह तितकी वाईट नाही पण तितकी छानही नाही…सुधारायला वाव असतो..जसा कलाकाराला सुधारणा करायला वाव असतो तस नाट्यगृहाचंही आहे असं सांगत त्यांनी एकप्रकारे सूचक वक्तव्य करत दोन्ही नाट्यगृहात आणखी सुधारणा होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली..यावेळी केडीएमसी आयुक्तांसह इतर अधिकारी देखील उपस्थित होते… मात्र नेमक्या काय सुधारणा पाहिजेत यावर थेट बोलणं त्यांनी टाळलं.
BYTE : प्रशांत दामले ( अभिनेता)