नागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मुंबईत जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होणार भाजपकडून कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईत जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होणार भाजपकडून कार्यक्रमांचे आयोजन

श्रीश उपाध्याय

मुंबई
————————-
‘महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हिंदू सण उत्सवांवर कठोर निर्बंध आले होते. मात्र, आता महाराष्ट्र हिंदुत्ववादी सरकार आलं आहे. आमचे नेते आणि राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू सण उत्सव आणि कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरे झाले पाहिजेत. इतरांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने उत्सव साजरे करण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे मुंबईत दहीहंडी आणि गणपतीच्या पाठोपाठ नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा होणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली आहे. भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्यासह प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर हे सुरांचा वर्षाव करणार असून या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून अभिनेते पुष्कर श्रोती उपस्थित असणार आहेत.

रविवार, दि. २५ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत आणि आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मुंबई भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अवधूत गुप्ते, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मिहीर कोटेचा म्हणाले की, ‘दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या नंतर आता मुंबई भाजपकडून नवरात्रोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर हा उत्सव आयोजित करण्यात आला असून मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाईल, अशी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. आम्हाला आशा आहे कि शेवटच्या 2 दिवसात सरकार 12 पर्यंत परवानगी देईल. 1 ऑक्टोबर वैशाली सामंत तसेच यानंतर अनेक कलाकार उपस्थित राहतील. प्रत्येक व्यक्तीला पास घेऊन प्रवेश मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जांबोरी मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स आणि अभ्युदय नगर या तीन जागांचा विचार करण्यात आला होता. मात्र, अखेरीस अभ्युदय नगरचा पर्याय भाजपने स्वीकारला आहे. अभ्युदय नगर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमात दररोज १० ते १५ हजार मुंबईकर सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे. अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमच्या सादरीकरणामुळे हा उत्सव आणखी मोठा होईल अशी आम्हांला आशा आहे.’ असे मिहीर कोटेचा यावेळी म्हणाले.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की मुंबईत दांडियाचा मोठा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दांडियाची आयोजन केले आहे. भाजपच्या या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

गायक अवधूत गुप्ते म्हणाले की, मुंबईत भाजपकडून मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आल्याचा मला मनापासून आनंद आहे. या कार्यक्रमात मला सलग गायला मिळणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून त्यासाठी मी भाजपचे खूप आभार मानतो. सुर नवा दास नवा च्या प्लॅटफॉर्म मी गरब्याचा ‘भोंडला’ हा गीतप्रकार गायला होता. त्यामुळे या कार्यक्रमात देखील मी ‘भोंडला’ गाणार आहे. या कार्यक्रमात मराठी गीतांसह हिंदी, गुजराती आणि इतर गाण्यांनाही प्राधान्य दिले जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button