करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पामध्ये घोटाळा

सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पामध्ये घोटाळा

मुंबई महापालिकेने सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा काढल्या असून या प्रकल्पामध्ये कंत्राटदाराने चढया दाराने भरलेल्या निविदा मंजूर करता याव्या तसेच कंत्राटदारालाच सोईचे व्हावे म्हणून प्रकल्पाची अंदाजित किंमतच वाढविण्याचे काम मुंबई महापालिकेने केले.

२०२० साली ज्या प्रकल्पाची किंमत १६ हजार कोटी होती ती आता २५ हजार ९६३ कोटी करण्यात आली असून चढया दाराने भरलेल्या निविदा मंजूर करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला आहे. हा एक मोठा घोटाळा असून महापालिका मुख्यालयातच हे घडले तसेच पोलीस मुख्यालयात बसून राज्याच्या पोलीसांनीच सामान्य माणसाचे मुडदे पाडण्याचा कट रचल्याचे षडयंत्र मनसूख हिरेन प्रकरणी उघड झाले आहे.

ठाकरे सरकारच्या काळात मंत्रालयातूनच सरकारी भूखंड विकले जातात, महापालिका मुख्यालयातून कंत्राटरांसाठी प्रकल्पाच्या किंमती वाढविल्या जातात तर पोलीस मुख्यालयात बसून पोलीसच सामान्य नागरीकांना मारण्याचा कट रचतात असे भयावह चित्र असून अराजकतेकडे राज्य कसे जातेय याचे हे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button