करमणूकक्राईमक्रीडानागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा

  • मुंबईकर लोकलप्रवाशांसाठी मध्य रेल्वेची नववर्षाची गोड भेट.
  • जानेवारी २०२२ पासून लोकल प्रवाशांना डब्यात मिळणार वायफाय सुविधा.
  • सर्वांना सहज रेंज मिळावी यासाठी सक्षम यंत्रणा बसविण्यात येणार.
  • मुंबई: मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांसाठी नव्या वर्षाची भेट आणली असून, जानेवारी २०२२ पासून लोकलमध्ये प्रवाशांना आता वायफायची सुविधा मिळणार आहे. मुंबईतील एकूण १६५ लोकलमधील तब्बल ३ हजार ४६५ डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना केवळ रेल्वे स्थानकांमध्येच वायफायची सुविधा मिळत होती. मात्र, आता थेट प्रवासादरम्यान डब्यातही वायफाय मिळणार आहे. (mumbaikar passengers will get wifi facility in local trains)
    लोकमधील सर्वच प्रवाशांना वायफायचा सहज वापर करता यावा यासाठी वायफायसाठी सक्षम यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लोकमध्ये गर्दी झाल्यानंतरही वायफायची रेंज सर्व प्रवाशांना मिळावी यासाठी तयारी करण्यात येत आहे. खरे तर लोकलमध्ये प्रवाशांनी प्रवास सुरू केल्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज निघून जाते. त्यांना मोबाईलवर बोलणेही शक्य होत नाही. असे होऊ नये यासाठी रेल्वेने आता लोकलमध्ये उच्च क्षमतेचा वायफाय राऊटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • हा प्रकल्प पूर्वीच येणे अपेक्षित होता. मात्र तो काही कारणास्तव रखडला होता. आता मात्र नव्या वर्षात तो पूर्ण करण्यात येत आहे. मध्य रेल्वे हे काम एका खासगी कंपनीकडून करून घेणार आहे. या खासगी कंपनीकडून मध्य रेल्वेच्या तब्बल १६५ लोकलमधील ३ हजार ४६५ डब्यांमध्ये वायफाय लावण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. लोकलच्या प्रत्येक डब्यात वायफाय लावले जात आहे.
  • ही वायफाय सुविधा मोफत असणार का?
    दरम्यान, ही उच्च क्षमतेची वायफाय सुविधा मोफत असेल का, याबाबत अद्याप रेल्वेने स्पष्ट केलेले नाही. रेल्वेची उत्पादन क्षमता वाढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने नवनवे उपक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत लोकलच्या डब्यांमधील वायफाय सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button