Uncategorizedकरमणूकक्राईमक्रीडानागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

मुंबईतील सिद्धिविनायकाबद्दल ‘हे’ माहिती आहे?

मुंबईतील सिद्धिविनायकाबद्दल 'हे' माहिती आहे?

मुंबई हे शहर अनेक गोष्टींसाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक पर्यटक मुंबई दर्शनासाठी येत असतात. मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत कोणीही उपाशी राहात नाही, असे म्हटले जाते. देशाप्रमाणे मुंबईदेखील विविधतेत एकतेने नटलेली आहे. अनेक जाती, धर्म, पंथाचे लोक एकत्रपणे मुंबई नांदतात. मुंबईत अनेक मंदिरे, धार्मिक स्थळे आहे. मात्र, सर्वांचे प्रथम आराध्य असलेल्या गणपतीचे श्री सिद्धिविनायक मंदिर जगविख्यात आहे. दररोज हजारो भाविक या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मंदिरात रेलचेल असते. मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे. दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जुन येतात. दर महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंगारकी चतुर्थीला तर पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग लागते. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी…

मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे. दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जुन येतात. दर महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंगारकी चतुर्थीला तर पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग लागते. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी…सिद्धिविनायक. श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रुपांपैकी विशेष असे रुप आहे. गणपतीच्या या रुपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरुपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते. म्हणूनच गणपतीच्या या स्वरुपात स्थापित झालेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते. उजव्या सोंडेच्या गणपतीचे व्रत आचरणे कठीण असते, असे मानले जाते. कारण ते योग्य पद्धतीने आणि कर्मठपणाने आचारावे, असे सांगितले जाते.

मूळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप छोटे होते, असे सांगितले जाते. घुमटाकार रचना असलेले या मंदिराचे बांधकाम सुरुवातीला विटांचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य स्वरुप देण्यात आले. या मंदिराचे बांधकाम १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये झाले. या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे अर्थसहाय्य एका महिलेने केले होते. या महिलेला मूल नव्हते. म्हणून गणपती मंदिराला सढळ हस्ते मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेली कोणतीही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा, अशी तिची इच्छा होती.

सिद्धिविनायकाची मूर्ती ही पाषाणाची आहे. याची सोंड उजव्या बाजूला आहे. या मंदिरात पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह गणपती विराजमान झाले आहेत. गणपतीचे हे स्वरुप अत्यंत मनमोहक, प्रसन्नता देणारे आणि मनःशांतीदायक असेच आहे. सिद्धिविनायकाच्या केवळ दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली आहेत. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो.

भारतातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी कोट्यवधी रुपये भाविकांकडून दान स्वरुपात मिळतात. शिवाय अनेक वस्तू सिद्धिविनायक चरणी अर्पण करतात. या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहे. या मंदिराकडून अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी कामे केली जातात. अनेकांना आर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक सामान्यांच्या मदतीला धावून जातो. सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आलेल्या मदतीची अनेक उदाहरणे देता येतील.

नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावून जाणारा गणपती अशी सिद्धिविनायकाची वेगळी ओळख आहे. सिद्धिविनायकाची मनापासून भक्ती केल्यास, तो भक्तांना निराश करत नाही. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी मान्यता आहे. या मंदिरात गणपतीचे वाहन असलेल्या उंदराच्या दोन चांदीच्या मूर्त्या आहेत. या उंदिर मामांच्या कानात भाविक आपली इच्छा प्रकट करतात. उंदिर मामा ती इच्छा गणपती बाप्पापर्यंत पोहोचवतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे. दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी व…+

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button